Maharashtra MLC Election Results | सत्यजीत तांबे भाजपमध्ये जाणार नाहीत…; मंत्री दीपक केसरकरांनी सांगितले कारण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची (Maharashtra MLC Election Results) मतमोजणी सध्या सुरू आहे. त्यात पहिला निकाल हाती आला तेव्हा, कोकणात भाजपचे (BJP) ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी शेकापचे बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा पराभव केला आहे. तर इतर मतदारसंघातील मतमोजणी अजून सुरू आहे. म्हात्रे यांच्या विजयानंतर सत्ताधारी भाजपच्या आशा पल्लवीत झाल्या असून, महाविकास आघाडीला कोकणात धक्का बसल्याचे बोलले जात आहे. त्यातच नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच आज माध्यमांशी संवाद साधताना मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी तांबे यांना भाजपमध्ये जाता येणार नाही. असे स्पष्टीकरण दिले आहे. व त्यासाठीचे कारण देखील यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra MLC Election Results)

भाजपनेते राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना सत्यजीत तांबे यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले होते की, ‘सत्यजितचा विजय निश्चित आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह राहणारच आहे.’ असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्यजीत तांबे यांना भाजप प्रवेशाची खुली ऑफरचं दिली होती. (Maharashtra MLC Election Results)

मात्र, आज याबाबत शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता, ते म्हणाले,
‘ सत्यजीत तांबे भाजपामध्ये जाणार नाहीत. मी एवढंच सांगितलं की तांबे कुठल्या पक्षात गेलेले नाहीत.
त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज केला आहे ही वस्तुस्थिती आहे. जेव्हा तुम्ही विधानपरिषदेत अपक्ष म्हणून राहता,
त्यानंतर तुम्ही कुठल्या पक्षात जाऊ शकत नाहीत. तुम्ही एखाद्या पक्षाला पाठिंबा देऊ शकता.
तांबे निवडून येतील अशी मला १०० टक्के खात्री आहे.’
असे म्हणत त्यांनी तांबे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
सोबतच त्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून तांबेचं निवडूण येणार. असा विश्वास व्यक्त केला.

Web Title :- Maharashtra MLC Election Results | eknath shinde group deepak kesarkar on satyajeet tambe win in mlc election results

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

State Cabinet Expansion | राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरचं..; दक्षिण महाराष्ट्रात मिळू शकतात ३ मंत्रीपदे

MSBSHSE Pune | दहावी-बारावी परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेनंतर परिक्षा कक्षात प्रवेश नाही