Maharashtra MLC Election Results | ‘सत्यजीत तांबे जिंकले तरीही तो भाजपचा विजय नसेल…;’ – जयंत पाटील

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालासाठी (Maharashtra MLC Election Results) मतमोजणी सुरू असून पहिला निकाल हाती आला तेव्हा, कोकण शिक्षक मतदारसंघात (Konkan Teacher Constituency) भाजपचे (BJP) ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांनी शेकापचे बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा पराभव केला. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात बदलाचे वारे वाहू लागल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra MLC Election Results)

त्यातच, नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी याबाबत एक सूचक वक्तव्य केले होते. यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले होते की, ‘सत्यजीतचा विजय निश्चित आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी आमचा आग्रह नेहमी राहणारचं आहे.’ असे सूचक वक्तव्य राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात यावरून चर्चेला उधान आले होते.

दरम्यान, विधानपरिषदांच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल (Maharashtra MLC Election Results) हाती येत आहेत. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांना नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik Graduate Constituency) सत्यजीत तांबे यांचा विजय म्हणजे भाजपचा विजय असेल का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, ‘नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांचा विजय झाला तरी, तो विजय भारतीय जनता पार्टीचा नसेल. कारण सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत.’ अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी दिली.

तर याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, ‘तो भाजपाच्या बाजुने निकाल नाहीये.
भाजपाला त्याठिकाणी उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे सत्यजीत तांबे अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले.
त्यामुळे महाविकास आघाडीने धुळे जिल्ह्यातील महिला नेत्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना उमेदवारी दिली.’

दरम्यान, पहिला निकाल हाती आला तेव्हा कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी
शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. तर औरंगाबाद येथून महाविकास आघाडीचे
(Mahavikas Aghadi) उमेदवार विक्रम काळे (Vikram Kale) आघाडीवर आहेत.
तर नागपूरातून देखील महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले (Sudhakar Adbale) हे आघाडीवर आहेत.

Web Title :- Maharashtra MLC Election Results | ncp leader jayant patil reaction on nashik graduate constituency satyajeet tambe bjp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

State Cabinet Expansion | राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरचं..; दक्षिण महाराष्ट्रात मिळू शकतात ३ मंत्रीपदे

MSBSHSE Pune | दहावी-बारावी परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळेनंतर परिक्षा कक्षात प्रवेश नाही