Maharashtra MLC Elections 2022 | पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून BJP कार्यालयासमोर राडा; उमेदवारी नाकारल्याने कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Elections 2022 | विधान परिषद निवडणूकीत (Maharashtra MLC Elections 2022) भाजपने (BJP) पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र त्यामध्ये भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र चर्चा रंगल्या आहे. दरम्यान मुंडे समर्थक देखील नाराज झाले आहेत. उमेदवारी नाकारल्याने औरंगाबादमध्ये (Aurangabad) पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी भाजपाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच रोखत कारवाई केली आहे.

 

भाजपकडून विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर (Praveen Darekar), प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नाही. त्यांच्या ऐवजी उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांचं नाव वगळण्यात आल्याने समर्थक नाराज झाले आहे.

 

त्यातूनच आक्रमक होत समर्थकांनी औरंगाबाद मधील उस्मानपुरा येथील कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे. या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंकजा मुंडेंवर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना यावेळी समर्थकांनी घोषणा देताना व्यक्त केली आहे. तसेच वारंवार डावलण्यात आल्याने नाराजीही उमटली आहे. या घटनेनंतर भाजपा कार्यालयाबाहेर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

Web Title :- Maharashtra MLC Elections 2022 | bjp pankaja munde supporters tried to attack party office in aurangabad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा