Maharashtra MLC Elections 2022 | भाजपची करेक्ट खेळी ! रोहित पवारांना आव्हान देण्यासाठी ‘या’ नेत्याला उमेदवारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Elections 2022 | सहा जागेसाठी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections 2022) आणि दहा जागेसाठी विधान परिषद निवडणूकीच्या (Maharashtra MLC Elections 2022) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आज (बुधवारी) भाजपकडून (BJP) विधान परिषदेसाठी उमेदवारी जारी करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर (Praveen Darekar), प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये राम शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या आहे.

राम शिंदे यांच्याकडे जामखेडची आमदारकी होती. मात्र 2019 च्या निवडणुकीमध्ये राम शिंदे यांना पराभव स्विकारावा लागला. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) रोहित पवार (Rohit Pawar) विजयी झाले. त्यामुळे त्या मतदारसंघात भाजपला एक मोठा धक्का बसला होता. आता भाजपने करेक्ट कार्यक्रम केला आहे. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी जामखेड मतदारसंघाचे राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. राम शिंदे यांना आता आमदारकी मिळणार असून त्या मतदार संघात भाजपचं पारडं जड होण्यास मदत होणार आहे. (Maharashtra MLC Elections 2022)

दरम्यान, राष्ट्रवादीच्या वाढणाऱ्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजपने खेळी केली आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांनी जामखेडमध्ये राष्ट्रवादीसोबत स्कोअर सेटल करण्यासाठी ही फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.
नगरमधून ओबीसी चेहरा देऊन भाजपने राम शिंदे यांचं पुनर्वसन केलं आहे.
त्यामुळे या उमेदवारीवरुन सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

 

Web Title :- Maharashtra MLC Elections 2022 | bjp selected ram shinde for mlc election 2022 to give challenge ncp mla rohit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळूनही धमकावणारा सावकार अटकेत

 

Maharashtra Crime | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची 6 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण