Maharashtra MLC Elections 2022 | उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटेंचा सवाल; म्हणाले – ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Elections 2022 | राज्यसभेनंतर विधान परीषदेच्या निवडणुकीवरुनही (Maharashtra MLC Elections 2022) राज्यात वातावरण तंग झालं आहे. अशातच आज (बुधवारी) भाजपने (BJP) विधान परिषदेसाठी पाच नावांची घोषणा केली आहे. त्यानंतर आता नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर ते नाराज आहेत. ‘भाजपने आम्हाला काय फक्त वापरुन घेतलं का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले.

 

भाजपकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) यांना उमेदवारी दिली आहे. तसेच, भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), चित्रा वाघ (Chitra Wagh), शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे तसेच रयत क्रांती पक्षाचे सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांना संधी देण्यात आली नाही. त्यामुळे काही नेत्यात नाराजींचा सूर उमटत आहे.

अशातच विनायक मेटेंनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं काय?’ असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपच्या यादीमध्ये त्यांचे 2014 पासून मित्र पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे नाव नाही.
भाजपच्या सत्तेच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधीही मिळाली नव्हती.
त्याचबरोबर इतर निवडणुकीतही त्यांना वाटा मिळाल्या नसल्याची तक्रार त्यांच्या कार्यकर्त्यांनी या आधीही करण्यात आली होती.
दरम्यान फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर होईल का? हे पाहावे लागेल.

 

Web Title :- Maharashtra MLC Elections 2022 | maharashtra mlc elections 2022 shivsangram vinayak mete on bjp candidate list maharashtra marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Price Today | कमॉडिटी बाजार ! सोने आणि चांदीचा भाव घसरला; जाणून घ्या

 

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळणारा खासगी सावकार गुन्हे शाखेकडून गजाआड

 

Samantha Ruth Prabhu | घटस्फोटानंतरही तुफान चर्चा ! बिकिनीत ‘या’ अभिनेत्रीचा बोल्ड लूक व्हायरल