Maharashtra MLC Elections 2022 | ‘मुंडे-महाजन-खडसे-फुंडकरांनी BJP ला बहुजन चेहरा दिला; पंकजांना उमेदवारी नाकारणं दुर्दैवी’ – एकनाथ खडसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra MLC Elections 2022 | राज्यसभेनंतर विधान परिषदेच्या (Maharashtra MLC Elections 2022) उमेदवारीवरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. भाजपने (BJP) विधान परिषदेसाठी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Srikant Bharatiya), राम शिंदे (Ram Shinde) यांना उमेदवारी दिली. मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलण्यात आलं आहे. यानंतर राज्यभर चर्चेला वेग आला आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

त्यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “एक काळ असा होता की, महाराष्ट्रात भाजप हा मारवाडी आणि ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जात असे. पण मुंडे – महाजन – खडसे – फुंडकरांनी या पक्षाला बहुजन चेहरा प्राप्त करून दिला. त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारणे हे दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. (Maharashtra MLC Elections 2022)

“कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला आहे.
एकेकाळी भाजपपासून महाराष्ट्रातील बहुजन समाज दूर होता.
त्या काळात फरांदे सर, अण्णा डांगे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर आणि प्रमोद महाजन या नेत्यांनी भाजपचा चेहरा बदलला.
महाराष्ट्रात भाजपचे आज जे स्थान आहे, त्यामध्ये गोपीनाथ मुंडे यांचा खूप मोठा वाटा आहे.
त्यांनी संघर्ष करून महाराष्ट्रात भाजपचा पाया रुजवला, पक्षाचा विस्तार केला.
अशा परिस्थितीत आज पंकजा मुंडे यांना भाजपने तिकीट नाकारणं हे दुर्दैवी आणि अन्यायकारक आहे.” असल्याचे ते म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra MLC Elections 2022 | ncp leader eknath khadse slams bjp over denied nonmination to pankaja munde for vidhan parishad election 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा