Maharashtra MLC Elections | कोकणात महाविकास आघाडीला मोठा धक्का; कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra MLC Elections | राज्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल आज लागणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय मंडळींची धाकधूक वाढली आहे. त्यातच कोकणातून महाविकास आघाडीच्या हाती निराशा समोर आल्याचे वृत्त हाती आले आहे. कोकण शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) हे शेकापचे बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा गड भेदण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे हे कोकण शिक्षक पदवीधर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. (Maharashtra MLC Elections)

 

यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यत्र जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, ‘आम्ही बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र, असा काही निकाल लागला असेल तर तो धक्का आहे.’ अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

 

तर, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय संपादित केल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, ‘ विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे (Konkan Division Teachers Constituency) बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचा विजय हा शिंदे – फडणवीस सरकारवरील कोकणवासीयांनी दाखविलेला विश्वास आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!’ अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. (Maharashtra MLC Elections)

दरम्यान, शेकापचा बालेकिल्ला असलेला कोकण शिक्षक मतदारसंघ (Konkan Teachers Constituency) भेदण्यात भाजप-शिंदे गट युतीला यश मिळाले आहे.
पहिल्या फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना तब्बल २२ हजार मते मिळाली होती.
तेव्हापासूनच म्हात्रे यांचा विजय निश्चित मानला जात होता.
मात्र, महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
औरंगाबाद मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय काळे (Vijay Kale) हे आघाडीवर असल्याची माहिती हाती येत आहे.

 

Web Title :- Maharashtra MLC Elections | maharashtra mlc election result live updates
nashik amravati konkan aurangabad nagpur graduate and teacher constituencies result

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा