Maharashtra Monsoon Rain Update | मान्सूनच्या प्रवासात अडथळा ! महाराष्ट्रात आता ‘या’ दिवशी बरसणार सरी – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Rain Update | गेल्या चार ते पाच दिवसापुर्वी मान्सूनने अंदमानात (Andaman) प्रवेश केला आहे. त्यानंतर मान्सून केरळात (Keral) दाखल झाला. त्यानंतर महाराष्ट्रात पावसाचं (Maharashtra Monsoon Rain Update) आगमन कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. मात्र गेल्या दोन दिवसांपुर्वी पाऊस अरबी समुद्रात (Arabian Sea) अवतरला असला तरी राज्यात पसरला नसल्याचं चित्र आहे. कारण मान्सून, अरबी समुद्रात दाखल झाला असला तरीही तिथंच त्यानं विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात पाऊस पडण्याचा कालावधी लांबणीवर पडला असल्याचे हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) सांगितलं.

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवस झाली सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) या ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. पहिल्यांदा पाऊस अरबी समुद्रात दाखल झाला. तेथुन काही ठिकाणी पाऊस कोसळला पण पुन्हा त्याने विश्रांती घेतली असल्याचं समोर आलं आहे. मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचे आगमन 2 दिवसांनी लांबणीवर गेले आहे. आगामी 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर 5 जूनला कोकणात (Konkan) आणि 7 जूनला मुंबईत (Mumbai) दाखल होणार असल्याचं हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) सांगितलं आहे.

दरम्यान, याअगोदर मान्सून मुंबईत 5 जूनला दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, सध्या त्यासाठी परिस्थिती पूरक नसल्याचे दिसत आहे. 10 ते 16 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवला आहे. तसेच, आगामी 2 ते 3 दिवसांत मान्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर राज्यात 3 ते 9 जूनमध्ये तो धडकणार आहे. 7 जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार आहे.

Web Title : Maharashtra Monsoon Rain Update | monsoon rain update mumbai maharashtra konkan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर