Maharashtra Monsoon Session | MPSC आणि B.Ed CET परीक्षा एकाच दिवशी, सरकारकडून विद्यार्थ्यांना दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या (Maharashtra Monsoon Session) पहिल्या दिवशी राज्य सरकारने MPSC आणि B.Ed CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. MPSC आणि B.Ed CET या परीक्षा 21 ऑगस्ट रोजी एकाच तारखेला होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती. मात्र, यावर सरकारने तोडगा काढला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देण्यात येणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले आहे.

 

दोन्ही परीक्षा एकाच दिवशी

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि बीएड सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. या दोन्ही परीक्षा एकाच तारखेला आल्या आहेत. यामुळे दोन्ही परीक्षा देणारे विद्यार्थी चिंतेत होते. एका परीक्षेला मुकावं लागणार की काय अशी भावना आणि संभ्रम त्यांच्या मनात होता. पण सरकारने (State Government) यावर तोडगा काढला आहे. दोन्ही परीक्षा देणाऱ्यांना तारखेबाबत पर्याय देणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

परीक्षार्थींनी सीईटी सेलशी संपर्क करावा

चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही परीक्षा एकाच दिवशी येण्याच्या गोंधळावर पावसाळी अधिवेशनात तोडगा सांगितला आहे.
ते म्हणाले, एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकत्र देणाऱ्या विद्यार्थ्यांना तारखेबाबत पर्याय दिला जाईल.
यासाठी परीक्षार्थींनी त्वरीत सीईटी सेलशी (CET Cell) संपर्क साधावा.
याठीकाणी तुम्हाला दोन्ही परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल.

 

Web Title : –  Maharashtra Monsoon Session | mpsc exam and bed cet exams on same day both exams on august 21 govt gave solution

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा