
Maharashtra Monsoon Session | ठाकरे गटाचा नीलम गोऱ्हेंच्या पदावर आक्षेप, कायद्याचा उल्लेख करत अनिल परब म्हणाले… (व्हिडिओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Session | राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने (NCP Ajit Pawar Group) शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ ठाकरे गटाच्या नेत्या (Thackeray group) आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आजपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाची (Maharashtra Monsoon Session) सुरवात वादळी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. त्याचा प्रत्यय विधान परिषदेमध्ये आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवीन मंत्र्यांची ओळख करुन दिल्यानंतर नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. यानंतर पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब (Anil Parab) यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली.
काय झालं विधान परिषदेत?
विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Monsoon Session) सुरुवात झाल्यानंतर विरोधी बाकांवरुन नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदी राहण्याचा आक्षेप घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. परंतु, त्यावर नंतर बोलण्यास वेळ दिला जाईल, असे म्हणत गोऱ्हे यांनी चर्चेला परवानगी नाकारली. तसेच अशा प्रकारे सभागृहाला वेठीस धरता येणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाँईट ऑफ ऑर्डर (Point of Order) उपस्थित केला. यानंतर शोकप्रस्ताव मांडून सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
काय म्हणाले अनिल परब?
पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोऱ्हे हे काम बघत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत:हून पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं आहे. दहाव्या परिशिष्टातील कायद्याच्या 2 अ मध्ये अपात्रतेची तरतूद (Provision of Disqualification) आहे. त्याअंतर्गत आम्ही त्यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केल्याची माहिती परब यांनी यावेळी दिली.
नबाम राबिया प्रकरणाचा दाखला
यावेळी बोलताना अनिल परब यांनी नबाम राबिया प्रकरणाचा (Nabam Rabia Case) दाखला दिला. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अपात्रतेचा निर्णय काय झाला हे सर्वांना माहित आहे. न्यायालयाने ही सगळी प्रकरणं अध्यक्षांकडे पाठवली आहेत. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये सभापती नाहीत. उपसभापतींवरच अविश्वासाचा ठराव आहे. यामुळे आम्ही त्यांना पदावरुन हटवण्याची नोटीस दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात नबाम राबिया प्रकरणातील दाखला देत स्पष्ट केलं आहे की, ज्यावेळी सभापती-उपसभापती पदावर अविश्वास ठराव दाखवला जातो, त्यावेळी त्या सदस्यांना खुर्चीवर बसण्याचा कायदेशीर अथवा नैतिक अधिकार नाही.
अनिल परब पुढे म्हणाले, जोपर्यंत अपात्रता याचिकेचा निर्णय लागत नाही, पदावरुन दूर करण्याच्या नोटीसबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत या सभापतींनी या खुर्चीवर बसू नये, अशी आमची भूमिका आहे. आमची भूमिका मांडू न दिल्यामुळे आम्ही सभात्याग केल्याचे परब यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यांवर टीका करताना परब म्हणाले, हे सरकार संख्याबळावर माजलंय. उपसभापती त्यांना पूर्णपणे मदत करत आहेत.
आज बहिष्काराचा निर्णय झाला आहे. आता महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) बैठकीत पुढची दिशा ठरवली जाईल,
असंही परब यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Web Title : Maharashtra Monsoon Session | thackeray faction mla anil parab slams neelam gorhe in mansoon session
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवून धमकाविणार्या ‘मजनू’ला दाखविली कोठडी
Parineeti Chopra And Raghav Chadha | परिणीती व राघव चड्ढा यांनी लग्नाआधी घेतला मोठा निर्णय
Siddharth Jadhav | लाखो रुपये कमवणाऱ्या सिद्धार्थ जाधवची ‘ही’ होती पहिली कमाई