Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता; आगामी 5 दिवसात जोर वाढणार – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | गेल्या काही दिवसांपासून लोक पावसाच्या (Rain) प्रतीक्षेत होते. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने दडी मारली होती. सध्या राज्यातील काही भागात पावसाची (Maharashtra Monsoon Update) रिपरिप दिसून येत आहे. अशातच आता राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवला आहे. तसेच, आगामी पाच दिवसामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

मुंबई (Mumbai), ठाण्यातही (Thane) रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी दोन दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागांत वादळी वाऱ्याचीही शक्यता आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांपासून कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्राच्या (Central Maharashtra) काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण असून कोकण विभागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) घाट विभागांतही पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. (Maharashtra Monsoon Update)

 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आदी भागांतही मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांतील घाट विभागातही काही प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या दरम्यान, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाची (Monsoon) गुजरातपर्यंत प्रगती झाली आहे.

 

दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा ओलांडून मोसमी पाऊस विदर्भातील बहुतांश भागात दाखल झाला.
जवळपास 99 टक्के महाराष्ट्र मोसमी पावसाने व्यापला आहे. त्याचबरोबर मराठवाडा,
विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | Heavy rains expected in maharashtra in
next five days of mumbai thane konkan central maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा