Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर; काही ठिकाणी प्रतिक्षा कायम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), कोकण (Konkan) आणि पुण्यातील (Pune) काही भागात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), मराठवाडा (Marathwada) विदर्भाच्या (Vidarbha) काही भागांत देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील काही ठिकाणी मात्र अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचं दिसत आहे. त्यानंतर आता राज्यभरात आगामी 2 ते 3 दिवस संपूर्ण कोकण विभागासह मुंबई, ठाणे परिसरात काही भागांत जोरदार पावसाचा (Maharashtra Monsoon Update) अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

मुंबईत आज (सोमवार) सकाळपासून ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी पावसाची (Monsoon Rain) संततधार सुरू आहे. रात्री मुंबईतील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मरिन ड्राइव्ह वरचं सध्याचे दृश्य आल्हाददायक असं आहे. त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. तर खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. (Maharashtra Monsoon Update)

दरम्यान, पालघर जिल्ह्यात (Palghar District) कालपासूनच मान्सून सक्रिय झाला असून, जिल्ह्याच्या बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. आज पावसाचा जोर कायम असून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, राज्याच्या इतर भागात पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. त्यामुळे अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचं दिसत आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील (Pune District) भोर आणि वेल्हा तालुक्यात पावसानंतर बहुतांश शेतकऱ्यांची भात पेरणी आटोपली आहे. मात्र पेरणीनंतर पाऊस लांबणीवर पडल्यानं याचा परिणाम भात रोपांवर होतोय. पाऊस नसल्याने भात उगवणीवर परिणाम होतोय. तसेच पावसाअभावी भात रोपांची वाढ मंदावली आहे. म्हणून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | imd monsoon update rain across the
state kokan pachhim maharashtra vidharbh khandesh pune mumbai thane palghar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा