Maharashtra Monsoon Update | राज्यात पाऊस सक्रिय ! मुंबईसह लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने (Maharashtra Monsoon Update) रिपरिप सुरू केली आहे. मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) काल पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पावसाची (Maharashtra Rain) परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर लातूर (Latur Rain) जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचं आगमन झाल्याने शेतकरी (Farmers) खुश आहे. काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतिक्षा असल्याचं दिसत आहे. भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department-IMD) अंदाजानुसार राज्यातील काही ठिकाणी आणखी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.

 

राज्यातील अनेक भागात चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. तसेच, ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला, त्या ठिकाणचे शेतकरी पेरणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या दरम्यान, रात्री मुंबई शहरासह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. त्याचबरोबर लातूर (Latur), बीड (Beed), मुंबई, सोलापूरच्या (Solapur) काही भागात पावसानं चांगली हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.

दरम्यान, आज सकाळपासूनच लातूर जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. काल दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. लातूर शहर लातूर ग्रामीण औसा, किल्लारीचा काही भाग रेनापुर, अहमदपूर, जळकोट आणि उदगीर मधील अनेक परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. पावसाची रिपरिप सध्या सुरूच असल्याचे दिसत आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | maharashtra monsoon rain update 27 june 2022
rains in mumbai, latur and some parts of the state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा