Maharashtra Monsoon Update | पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता; मुंबई, ठाणेसह कोकणातही बरसणार सरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | काही दिवसांपासून राज्यासह देशात उन्हाचा चटका वाढला आहे. गरमीने माणसं त्रस्त झाली आहेत. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करत आहेत. एकीकडे अशी स्थिती असतानाच दुसरीकडे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. या वादळी वाऱ्यामुळे पावसालाही विलंब झाला आहे. भारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department (IMD) बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biporjoy) इशारा दिला आहे. चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत काही राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आता चक्रीवादळात रूपांतरित झाले आहे. हे चक्रीवादळ वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. या चक्रीवादळामुळे पुढील 24 तासांत काही राज्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस (Maharashtra Monsoon Update) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. वादळी वाऱ्यामुळे केरळ किनारपट्टीकडे सरकणारा मान्सून लांबला आहे. आग्नेय अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सूनच्या आगमनावर परिणाम झाल्याचे हवामान खात्याने सोमवारी सांगितले होते. मात्र, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख मात्र हवामान खात्याने दिलेली नाही.
व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1666505272263864321
पूर्व मध्य अरबी समुद्रावरील बिपरजॉय चक्रीवादळ गेल्या 6 तासात 6 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकले आहे. चक्रीवादळामुळे केरळ-कर्नाटक किनारपट्टी आणि लक्षद्वीप-मालदीव आणि कोकण, गोव्याच्या किनारपट्टीवर 8 ते 10 जूनपर्यंत खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यासह कोकणात पावसाची शक्यता
चक्रीवादळ हळूहळू तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता आहे.
येत्या 24 तासांत मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघरसह (Palghar) रायगड (Raigad), रत्नागिरी
(Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आग्नेय आणि लगतच्या
पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील खोल दाब क्षेत्र 4 किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे सरकले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ बुधवारी गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 920 किमीवर तर मुंबईच्या 1050 किमी नैऋत्य,
पोरबंदर पासून 1130 किमी दक्षिण-नैऋत्येस होते.
Web Title : Maharashtra Monsoon Update | maharashtra will face heavy rainfall and storm in next 24 hours mumbai thane konkan rain alert biporjoy cyclone india latest updates
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या