Maharashtra Monsoon Update | मान्सून सक्रीय ! मराठवाड्यात वीज पडून 5 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | गेल्या दोन दिवसापासून मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र दाखल झाला आहे. पुढील 48 तासांत मान्सूनमध्ये आणखी वेगाने प्रगती दिसून येऊ शकते. तर राज्यात पुढील काही दिवसात मान्सून (Maharashtra Monsoon Update) सक्रीय होणार आहे. राज्यात पुढील ४-५ दिवसात जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. राज्यातील काही भागात उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. काल (शनिवार) मराठवाड्यातील अनेक भागात पाऊस झाला. या पावसामुळे मराठवाड्यात वीज पडून ५ जणांचा मृत्यू (Death) झाला.

 

मध्य महाराष्ट्रासह (Central Maharashtra) मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुण्यासह (Pune) कोकणात (Konkan) बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे तर उर्वरित भागात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवला आहे. तसेच पुढील दोन दिवसांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)

मराठवाड्यातील बळीराजा सुखावला आहे. मराठवाड्यामध्ये काल (शनिवार) अनेक भागात पावासाने हजेरी लावली आहे. या पावसात वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात 2 तर जालना जिल्ह्यातील 3 जणांचा समावेश आहे. 3 जण जखमी झाले आहेत. गेली 2 दिवस चांगला पाऊस झाल्याने बळीराजा मात्र सुखावला आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon active in mumbai and marathwada
too 5 killed in lightning strike imd issues red alert

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा