Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर; मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | राज्यातील काही भागात पावसाने दमदार (Maharashtra Monsoon Update) हजेरी लावली आहे. अशातच मुंबईसह (Mumbai) उपनगर ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) परिसरात दोन दिवसांपासून पाऊस कोसळताना दिसतो आहे. पुण्यासह (Pune) राज्यातील इतर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला असल्याचं चित्र आहे. दरम्यान, आज (सोमवार) आणि उद्या (मंगळवार) भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) मुंबईसह कोकणात ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे.

सोमवार आणि मंगळवारी मुंबईसह उपनगरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर चार दिवस कोकणसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती हवामान खात्यानं (IMD) दिली आहे. दरम्यान, कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तसेच, पुण्यातही सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. (Maharashtra Monsoon Update)

 

 

या दरम्यान, नैऋत्य मान्सून कालच गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड,
गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला असल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचबरोबर मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे.
राज्यात मान्सून (Monsoon) दाखल झाला असला तरी अजुन राज्याच्या इतर भागात मात्र पावसाची प्रतिक्षा कायम असल्याचं चित्र आहे.

 

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon active over maharashtra state severe weather alerts for 5 days by imd heavy rf alerts cont including mumbai thane maharashtra news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

LIC Share Price | ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये घसरणीमुळे निराश आहात, JP Morgan चा हा रिपोर्ट तुमची चिंता दूर करेल

 

Vidhan Parishad Election 2022 | हितेंद्र ठाकूर यांची संजय राऊतांना चपराक; म्हणाले – ‘तुमच्यात हिंमत असेल तर…आमदार काय मच्छिबाजार वाटला का ?’

 

Punit Balan Group | पुनीत बालन ग्रुपने भारतीय स्टार टेनिसपटू ऋतुजा भोसले सोबत केला करार !