Maharashtra Monsoon Update | राज्यात काही ठिकाणी पावसाची दमदार हजेरी; शनिवारपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | राज्यात मोसमी पावसाचं आगमन (Maharashtra Monsoon Update) झाले आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस होताना दिसत आहे. परंतु, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबई आणि परिसरात चांगलाच पाऊस झाला. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघरसह (Palghar) पुणे (Pune), सांगली (Sangli), वाशिम (Washim), यवतमाळ (Yavatmal), सिंधुदुर्ग (Sindhudurg), बुलढाणा (Buldhana) या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर राज्यात (शनिवार) 18 जून 2022 पासून मान्सून सक्रीय होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) वर्तवली आहे.

 

कुठे मान्सून तग धरत नाही तर कुठे एकाएकी आलेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच धांदल उडवली आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याणमध्ये नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली आहे. त्याचबरोबर हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण (Konkan), दक्षिण मध्य महाराष्ट्रात (South Central Maharashtra) मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. असं सांगण्यात येत आहे. (Maharashtra Monsoon Update)

दरम्यान, हवामान शास्त्राच्या निकषांनुसार मोसमी पाऊस महाराष्ट्रभर पोहोचला असला
तरी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग कमी असल्याने पावसाचे प्रमाण कमी आहे.
त्यामुळे चिंता व्यक्त केली असतानाच पावसाच्या आगमनाबाबत संकेत मिळू लागले आहेत.
तसेच, शनिवार किंवा रविवारपासून दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागांत
पाऊस हळूहळू जोर धरणार असल्याचे हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | Monsoon konkan mumbai maharashtra rain updates today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा