Maharashtra Monsoon Update | राज्यातील काही भागात पावसाची दमदार हजेरी; आजही मुंबई, पुण्यात पावसाची रिपरिप सुरूच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यातील काही ठिकाणी पावसाची (Maharashtra Monsoon Update) परिस्थिती निर्माण झाली आहे. काल मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), कोकण (Konkan), पुण्यासह (Pune) विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. रात्रीच्या सुमारास देखील पावसाचा जोर वाढला होता. आज सकाळपासूनही पुण्यासह काही जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्यात मान्सून अवतरला असल्याचं हवामान खात्याने (Indian Meteorological Department-IMD) सांगितलं आहे.

 

दोन दिवसाची विश्रांती घेतलेल्या पावसाने (Monsoon) सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. मागील काही दिवस लपंडाव करणारा पाऊस सोमवारी सिंधुदुर्गात मुसळधार कोसळला आहे. तळ कोकणातील शेतकरी पेरणीची कामे आटपून लावणीआधी कामाच्या तयारीला लागले आहेत. त्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आज सकाळपासूनही पावसाला सुरूवात झाली आहे.

ठाणे, पालघर, पुणे, परभणी, चंद्रपूर, वाशिम, नागपूर, अहमदनगर या जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
तसेच, मुंबईला तर पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | monsoon rain konkan mumbai pune maharashtra update

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा