Maharashtra Monsoon Update | महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार? हवामान विभागाकडून महत्वाची अपडेट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | गुरूवारी अखेर मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रात पावसाचे (Maharashtra Monsoon Update) आगमन कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा वादळी वाऱ्यांमुळे मान्सून केरळमध्ये उशिराने दाखल झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्रालाही पावसासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार? याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून लोकांना उन्हाची झळ सोसावी लागत आहे. त्यातून सुटका व्हावी यासाठी आता सर्वांचे डोळे पावसाकडे लागले आहे. एकीकडे केरळमध्ये पाऊस पोहोचला आहे. पण, मुंबईसह (Mumbai) राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्रात पावसाच्या (Maharashtra Monsoon Update) अंदाजाबाबत हवामान विभागाने (Indian Meteorological Department-IMD) माहिती दिली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार (IMD), गुरुवारी मान्सून केरळमध्ये पोहोचल्यानंतर हवामान तज्ज्ञ मान्सूनच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. एकीकडे अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले असताना दुसरीकडे देशात मान्सून पोहोचला आहे. मान्सून साधारणपणे दि. 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतो आणि दि. 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होतो. मात्र, आता केरळमध्ये पाऊस उशिरा दाखल झाल्याने राज्यातील पाऊसही लांबला आहे.

आयएमडी प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस. जी. कांबळे (S. G. Kambale) यांनी सांगितले की, महाराष्ट्रात दि.10 जून आणि मुंबईत दि. 11 जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे. मान्सून सध्या केरळमध्ये पोहोचला असून त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनच्या सुरुवातीबाबत माहिती मिळेल.

दरम्यान, साधारणपणे दि. 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होणारा पाऊस दि. 8 जूनला केरळमध्ये पोहोचला.
या पार्श्वभूमीवर दि. 18 जूनपर्यंत महाराष्ट्रात पाऊस येण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
यामध्ये दोन ते तीन दिवसांचा फरक जाणवू शकतो.
तसेच मान्सून बंगालचा उपसागर आणि दक्षिण पश्चिम मध्य आणि ईशान्य भागात पोहोचणार आहे.
हवामान विभाग यावर लक्ष ठेवून आहे. पुढील 24 तासांत तामिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटकमध्ये (Karnataka) मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

 

Web Title : Maharashtra Monsoon Update | monsoon update monsoon reached kerala after delay 7 days imd monitoring progress of weather

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा