Maharashtra Monsoon Update | देशात आगामी 4 दिवस पाऊस, महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी – IMD

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | मागील अनेक दिवसांपासून राज्यासह देशात तापमान वाढलं आहे, त्यामुळे माणसाला उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. अशातच आता हवामानात बदल होऊन राज्यात पावसाची (Maharashtra Monsoon Update) स्थिती निर्माण झाली आहे. सध्या राज्याच्या काही भागात पूर्वमोसमी पावसाच्या सरीची हजेरी आहे. कोकण (Konkan), पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) , मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) काही भागात काल पावसाच्या (Rain) सरी कोसळल्या. आता आगामी 1 ते 2 दिवस पावसाचा अंदाज कायम असल्याचं हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department – IMD) सांगण्यात आलं आहे.

 

देशातील पश्चिम-उत्तर, पूर्वोत्तर आणि दक्षिणेकडील काही राज्यात आगामी 3 ते 4 दिवस जोरदार पाऊस (Rain In India) होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातून सध्या मोठ्या प्रमाणावर वारे वाहत आहेत. तसेच, देशात अनेक भागात कमी दाबाचे पट्टे निर्माण झालेत. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात प्रामुख्याने बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे पाऊस पडतो आहे. सोलापूर, सांगली, जालना, उस्मानाबाद. चंद्रपूर, यवतमाळसह दक्षिण कोकणात काही भागात काल पूर्वमोसमी पाऊस झाला आहे. (Maharashtra Monsoon Update)

दरम्यान, अंदमान-निकोबार बेटांवर (Andaman And Nicobar Islands) सध्या मोसमी पाऊस होतो आहे.
या दरम्यान, पुढील 2 दिवसात पाऊस दक्षिण अरबी समुद्रात दाखल होतील, अशी शक्यता आहे.
त्याचबरोबर आगामी 1 ते 2 दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, परभणी,
हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली आदी भागांत पावसाची शक्यता आहे.
कोकणात काही भागांत मुसळधारांची शक्यता असून, किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | pre monsoon rain in maharashtra four days of rain in many parts of the country

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा