Maharashtra Monsoon Update | पाऊस आला रे ! आगामी 2 दिवसांत मोसमी पाऊस महाराष्ट्रात धडकणार – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Update | जून महिना उजाडला आहे. आता जनतेचे डोळे पावसाच्या सरीकडे लागले आहे. तसेच, मोसमी पावसाच्या हंगामाचा दिलासादायक अंदाज भारतीय हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) वर्तवण्यात आला आहे. आगामी दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी पाऊस महाराष्ट्रात धडकणार (Maharashtra Monsoon Update) असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 2 ते 3 दिवसात मान्सून गोवा (Goa) आणि कोकणाच्या (Konkan) दिशेने सरकेल. सध्या मोसमी पाऊस कर्नाटकात (Karnataka) असून लवकरच महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तवली आहे.

 

यावर्षी भारतात 96 टक्के ते 104 टक्के पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. मान्सून कोअर झोन (Monsoon Core Zone) म्हणजे शेती सर्वाधिक असलेल्या मध्य भारतात सामान्य पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर काल राज्यातील काही जिल्ह्यात पावसानं हजेरी देखील लावली आहे. मात्र हा मोसमी पाऊस नाही असं स्पष्टीकरण हवामान खात्याने दिलं आहे. (Maharashtra Monsoon Update)

 

देशाच्या चार भागांचा विचार केला तर, मध्य भारतात सामान्य अर्थात 106 टक्के दीर्घकालीन पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. हाच अंदाज दक्षिण पेनिन्स्युलामध्ये 106 टक्के तर ईशान्य भारतामध्ये 96 ते 106 टक्के दीर्घकालीन पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

 

महाराष्ट्रातील स्थिती काय असणार?

महाराष्ट्रात बहुतांश भागात 4 महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मुंबई (Mumbai)
परिसरातील काही भाग वगळता कोकण आणि किनारपट्टीच्या भागासह पूर्व विदर्भात (East Vidarbha)
पावसाचे प्रमाण सर्वसाधारण असणार आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra),
पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra) त्याचप्रमाणे मराठवाड्यातील (Marathwada) बहुतांश भाग आणि
विदर्भात 3 ते 4 जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जादा राहणार असल्याचे दिसून येत आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Update | rain monsoon updates konkan maharashtra kerala karnataka marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा