Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Updates | राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलाच उकाडा जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे गरमीचे प्रमाण देखील वाढलं आहे. असं असलं तरी राज्यातील काही भागात पावसाची (Rain in Maharashtra) परिस्थितीही निर्माण झाली आहे. यंदा लवकरच पावसाचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) देण्यात आली आहे. मुंबईमध्ये (Mumbai) येत्या 6 जून रोजी मान्सूनचं (Maharashtra Monsoon Updates) आगमन होण्याची शक्यता आहे. वेळेआधीच मुंबईत (Mumbai Rains) मान्सूनच्या सरी बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या 1 जूनला केरळमध्ये (Kerala), तर 6 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होईल असं भाकित वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आगामी 3 ते 4 दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्र (South-Central Maharashtra), दक्षिण कोकण (South Konkan) आणि मराठवाड्यात (Marathwada) काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. परंतु, त्याचवेळी उत्तर मध्य महाराष्ट्र (North-Central Maharashtra) आणि विदर्भात (Vidarbha) काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता असल्याचे हवामान खात्याने (IMD) सांगितले. (Maharashtra Monsoon Updates)

दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान, लातूर जिल्ह्याला काल संध्याकाळी पावसानं चांगलंच झोडपलं आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी, हालसी, तुगाव, तगरखेडा, हलगरा, सावरी गावात वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला आहे. या ठिकाणी अनेक पिकांचे नुकसान झाले तर अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Updates | imd latest report monsoon will arrive in mumbai from
6th june also kokan vidharbh marathwada maharashtra rains

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा