Maharashtra Monsoon Updates | मान्सून आला..! महाराष्ट्रात ‘या’ दिवशी पावसाचं आगमन होणार – IMD

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Updates | एकिकडे राज्यातील काही भागात उन्हाचा कडाका लागला आहेत. तर दुसरीकडे पावसाचीही परिस्थीती निर्माण झाली आहे. दरम्यान, काही दिवस आधीच सोमवारी मान्सून अंदमानात (Andaman) दाखल झाला आहे. आता महाराष्ट्रात पावसाचं (Maharashtra Rains) आगमन कधी होतंय. याची उत्सुकता लागली आहे. तर मान्सूनचे अंदमानात आगमन झालेलं असतानाच आता केरळातही (Kerala) तो 25 ते 27 मे या दिवसा दरम्यान पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याने Indian Meteorological Department (IMD) वर्तवला आहे. (Maharashtra Monsoon Updates)

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. मात्र, हा मान्सून नसून, अवकाळी पाऊस आहे. परिणामी या पावसाला मान्सून समजण्याची चूक करु नका कारण, या पावसानंतर तापमानात वाढ झाल्याचे निरिक्षणास आल्याचे पाहायला मिळत आहे. (Maharashtra Monsoon Updates)

दरम्यान, मान्सूनसाठी सर्व परिस्थिती पूरक असल्यामुळे त्याचा प्रवास हा अतिशय वेगाने होत असल्याची माहिती हवामान विभागाने (IMD) दिली आहे. केरळमध्ये आल्यानंतर मान्सून महाराष्ट्रात येण्यास फार वेळ जाणार नाही असं देखील सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर नैऋत्य मोसमी वाऱ्यांची दिशा आणि त्यांना मिळालेली गती पाहता 10 जून ऐवजी तळकोकण आणि बहुतांश कोकण (Konkan) किनारपट्टी भागात मान्सून 2 जूनला धडकणार असल्याची चिन्हे आहेत. असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

Web Title : Maharashtra Monsoon Updates | monsoon journey andaman kerala maharashtra konkan region rains

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी