Maharashtra Monsoon Updates | आगामी 2 ते 3 दिवसांत मान्सून अरबी समुद्रात दाखल होणार – IMD

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Monsoon Updates | महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून सर्वांनाच उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आता या संकटापासून दिलासा मिळणार आहे. कारण मान्सूनने अंदमानात (Andaman) धडक दिली आहे. र्नैऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon Rains) आगामी 2 ते 3 दिवसांत दक्षिण अरबी समुद्रात पोहोचणार आहे. त्यामुळे गरमी पासून मुक्तता होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या Indian Meteorological Department (IMD) अंदाजानुसार सध्या मोसमी वा-यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशातील अनेक भागात पावसाची (Rains) स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात (Maharashtra Rains) देखील काही ठिकाणी पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात येते. (Maharashtra Monsoon Updates)

 

यंदा मान्सून लवकर अंदमानात दाखल झाला आहे. वा-यांनी 18 मे रोजी उत्तर-पूर्व दिशेने बंगालच्या उपसागरात प्रगती केली आहे. दक्षिणेच्या बाजूने मात्र त्यांनी अजुन प्रगती केलेली नाही. पण, पोषक वातावरण असल्याने आगामी 2 ते 3 दिवसांमध्ये मोसमी वारे दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरासह दक्षिण अरबी समुद्रापर्यंत (South Arabian Sea) पोहचतील असा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. (Maharashtra Monsoon Updates)

दरम्यान, राज्यात आगामी 2 ते 3 दिवस कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देखील दिला आहे. पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतही पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. त्याचबरोबर विदर्भात प्रामुख्याने अमरावती आणि अकोल्यात 21 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होणार आहे. असं असलं तरी काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा देखील असल्याचं म्हटलं आहे.

 

Web Title :- Maharashtra Monsoon Updates | seasonal rain sea favorable conditions monsoon winds maharashta rains

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा