दहावीचा निकाल ६ जून रोजी जाहीर होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावीच्या परीक्षेचा निकाल ६ जून रोजी जाहीर होणार असल्याची दाट शक्यता आहे. याबाबतची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे. यंदा दहावीची परीक्षा १ मार्च २०१९ ते २२ मार्च २०१९ दरम्यान घेण्यात आली होती.

महाराष्ट्र बोर्डाने मागील आठवड्यात बारावीचा निकाल जहीर केला होता. त्यामुळे आता दहावीचा निकाल कधी लागणार याबद्दल पालक व विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली आहे. मागील वर्षी बोर्डाकडून दहावीचा ऑनलाईन निकालल ७ जून रोजी जाहीर करण्यात आला होता.

येथे पहा निकाल
दहावीचा निकाल बोर्डाच्या
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

या संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर होईल.

असा पहा निकाल
१० वीचा निकाल पाहण्यासाठी दिलेल्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट जा. त्यानंतर रिझल्ट लिंकवर क्लिक करा. त्यानंतर रोल नंबर, नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.

https://www.inkhabar.com/job-and-education/maharashtra-msbshse-ssc-10th-result-2019-maharashtra-board-class-10-result-2019-to-be-declared-on-6-june-www-mahresult-nic-in