Maharashtra Municipal Election 2022 | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्येच !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Municipal Election 2022 | राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्य निवडणुक आयोगाला दिला आहे. परंतू न्यायालयात यापुर्वीच पावसाळ्यात निवडणुका शक्य नाही, असे प्रतिज्ञापत्र देणारे निवडणुक आयोग पावसाळयामुळे ‘ऑक्टोबर’ पर्यंत निवडणुक शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र पुन्हा एकदा न्यायालयात देणार असल्याची माहिती. यामुळे तुर्तास तरी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबर मध्येच होण्याची चिन्हे आहेत. (Maharashtra Municipal Election 2022)

 

राज्यातील १४ महापालिकांसह काही जिल्हा परिषदांवर सध्या प्रशासक नेमलेले आहेत. ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्याने या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होउ शकल्या नाहीत. दरम्यान, यासंदर्भात दाखल याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून राज्य निवडणुक आयोगाने पुढील दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे निवडणुका केंव्हा होणार याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Municipal Election 2022)

 

अशातच निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोग न्यायालयात प्रतिज्ञापत्र देण्याच्या तयारीत आहे.
पुढील महिन्यांत राज्यात पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यामध्ये निवडणूक यंत्रणेसोबतच आपत्कालीन यंत्रणेसाठी मोठे मनुष्यबळ लागणार आहे.
पावसाळ्याचा निवडणुकीच्या तयारी आणि मतदानावरही परिणाम होणार आहे.
त्यामुळे पावसाळ्यानंतर ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेणे योग्य होईल, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार आहे. दरम्यान,
राज्य शासन देखिल ओबीसीच्या मुद्दयावरून पुन्हा न्यायालयात अपिल करण्याची तयारी करत असल्याने तूर्तास तरी निवडणुका होणार नाहीत,
अशी चर्चा अधिकारी वर्तुळात आहे.

Web Title :- Maharashtra Municipal Election 2022 | Maharashtra Local Body Election Possible In October 2022


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Deepali Dhumal | पुणे शहरात सर्व ठिकाणी शहरी गरीब योजनेचे कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध करा

Pune Crime | प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक किशोर पाटे, संकेत पाटे, रोहन पाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

 

Raosaheb Danve | ‘मला महाराष्ट्राचा ‘ब्राह्मण’ मुख्यमंत्री पाहण्याची इच्छा आहे’ – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेतील उपायुक्त अजित देशमुख यांची मिळकत कर विभागप्रमुखपदी तर आशा राउत यांची घन कचरा व्यवस्थापन विभागप्रमुखपदी नियुक्ती

Salman Khan Net worth | 2300 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे ‘दबंग’ सलमान खान, लग्न झाले नाही तर हा असेल ‘भाईजान’चा वारस