Maharashtra Municipal Election | महापालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता; सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Municipal Election | इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) पेच निर्माण झाल्याने मागील अनेक दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणुकांचा (Maharashtra Municipal Election) प्रश्न तसाच प्रलंबित आहे. अनेक जिल्ह्यात महापालिकांची मुदत संपली असून त्या ठिकाणी प्रशासनाची नियुक्ती झाली आहे. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सुनावणी वरुन एक मोठी माहिती समोर आली आहे. आज होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आल्याने महापालिका निवडणुका आणखी लांबतात की काय ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून याचिका फेटाळली जाऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होईल अशी आशा इच्छूक उमेदवारांची होती.
त्यामुळे सर्व नेते, स्थानिक नगरसेवक, आणि इच्छूक नगरसेवकांच्या नजरा आजच्या सुनावणीकडे होत्या.
मात्र, त्याला अखेर आजचा पुर्णविराम मिळाला असून महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली असून ती आता 25 एप्रिल रोजी होणार आहे.
त्यामुळे आता महापालिका निवडणुकांची (Maharashtra Municipal Election) तारीख लवकर जाहीर होतेय की आणखी लांबणीवर पडते ? हे येत्या 25 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीत स्पष्ट होईल.

 

Web Title :- Maharashtra Municipal Election | maharashtra municipal corporation elections will be extended further supreme court adjourned the hearing

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा