नांदेडमध्ये लिंगायत समाजाच्या साधुची हत्या, मृतदेह घेऊन जाण्याच्या होता हल्लेखोरांचा इरादा, सर्वत्र खळबळ

नांदेड, पोलीसनामा ऑनलाईन : महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात लिंगायत समाजातील साधूचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याच समाजातील एका व्यक्तीवर खुनाचा आरोप आहे. शनिवारी रात्री 12 ते 12.30 च्या दरम्यान पशुपती महाराज नावाच्या एका साधूचा खून करण्यात आला. पशुपती महाराज व्यतिरिक्त दुसर्‍या व्यक्तीचीही हत्या करण्यात आली आहे. ज्याचे नाव भगवान राम शिंदे असे सांगितले जात आहे. तथापि, खून करणारा साईनाथचा साथीदार म्हणून या व्यक्तीची ओळख पटली आहे.

कसा झाला खून?

शनिवारी रात्री खुनाचा आरोपी साईनाथ दरवाजा उघडून आश्रमात घुसला. कारण दरवाजा तोडल्याची खूण कुठेच दिसत नव्हती. दरवाजा आतून उघडाच होता, तो उघडा कसा याबद्दल सध्यातरी माहिती समोर आलेली नाही. पशुपती महाराजांच्या खुनानंतर आरोपी साईनाथ साधूंच्या मृतदेहास गाडीत ठेऊन बाहेर पडायच्या प्रयत्नात होता. पण गाडी गेटमध्येच फसली. यावेळी छतावर झोपलेले आश्रमातील दोन सेवादार जागे झाले. जोपर्यंत त्यांना घडलेला प्रकार लक्षात येईल त्याआधीच आरोपीने पळायला सुरुवात केली. त्यानंतर सेवादारांनी आरोपीचा पाठलाग केला. पण तो निसटला.

सकाळी आणखी एक मृतदेह सापडला

रविवारी सकाळी जिल्हा परिषद शाळेजवळ आणखी एक मृतदेह सापडला. भगवान राम शिंदे असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आरोपी साईनाथचा साथीदार आहे. भगवान राम शिंदे देखील लिंगायत समाजातील आहे. त्याचा खून साईनाथ ने केला की मग कुणी दुसऱ्याने, पशुपती महाराजांच्या खुनाच्या आधी की नंतर अशा बऱ्याच प्रश्नांचा शोध सध्या पोलिसांमार्फत घेण्यात येत आहे. पशुपती महाराज 2008 पासून या मठात वास्तव्य करीत आहेत. हे मठ निर्वामी मठ म्हणून ओळखले जाते.