×
HomeUncategorizedMaharashtra Navnirman Sena | 'दररोज सकाळी उठून कादर खानप्रमाणे ...', संजय राऊत...

Maharashtra Navnirman Sena | ‘दररोज सकाळी उठून कादर खानप्रमाणे …’, संजय राऊत यांच्या टीकेनंतर मनसे आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Maharashtra Navnirman Sena) यांच्या पक्षाच्या गटाध्यक्षांचा रविवारी मुंबईत मेळावा पार पडला. त्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना. ‘राजकारण म्हणजे नकला करणे नाही. लोकांचे आवाज काढणे खूप झाले. आता थोडे मोठे व्हा आणि संघटनात्मक काम करा,’ अशी टीका राज ठाकरेंवर केली. संजय राऊतांच्या या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) प्रवक्ते गजानन काळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

काय म्हणाले संजय राऊत?
‘राजकारण म्हणजे मिमिक्री नव्हे. आम्हाला जर मिमिक्री पाहायची असेल, काही मुद्रा अभिनय, नाट्य अभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरला पाहू, आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचे’, अशी उपरोधिक टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. टीकेला उत्तर देताना गजानन काळे यांनी ‘दररोज सकाळी उठून कादर खानप्रमाणे आक्रस्ताळेपणा करणं म्हणजे, राजकारण आहे का? असा प्रश्न विचारला आहे.

 

काय म्हणाले गजानन काळे?
गजानन काळेंनी ट्विट करत संजय राऊत आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर वर हल्लाबोल केला. ‘राजकारण म्हणजे सकाळी उठून रोज आक्रस्ताळेपणा करून ‘कादर खान’सारखा अभिनय करणे नव्हे. आदरणीय बाळासाहेब यांच्या भाषणाला पण काँग्रेसवाले मिमिक्रीच म्हणायचे, आज त्यांचीच भाषा काँग्रेस – राष्ट्रवादीचा लाळघोटेपणा करणारे संजय राऊत करत आहेत. राऊतांच्या या ‘पोपटपंची’ला जनता कंटाळली आहे. (Maharashtra Navnirman Sena)

गजानन काळे पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या परंपरेला साजेस बोलूनही राजसाहेबांवर शाब्दिक वार करायची संधी काँग्रेस सोडत नाही. ठाकरी भाषा व गल्लीतल्या नाक्यावराची भाषा समजायला काँग्रेसवाल्यांनी मेंदू शाबूत ठेवून संयुक्त महाराष्ट्र लढा वाचावा. लोंढे, सावंतांचे एका ताटात जेवायचे वांदे, काय तर म्हणे भारत जोडो यात्रा.’

तसेच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर केलेल्या युतीवर टोला लगावला.
‘काँग्रेस म्हणजे शिवी … राष्ट्रवादीचं प्रदूषण हटवा अशी विधानं तुमचं पक्ष नेतृत्व व छोटे नवाब हे काँग्रेस,
राष्ट्रवादी बाबत करत होते मात्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी सगळे गुंडाळून यांच्यासोबत जाऊन सत्ता उपभोगायची
याला तुमच्या भाषेत अंधारे ताई काय म्हणतात?#आळीमिळीगुपचिळी’

 

Web Title :- Maharashtra Navnirman Sena | mns gajanan kale on sanjay raut statement on raj thackeray mimicry in mumbai speech

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Meena Deshmukh | दुर्देवी ! ज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचे अपघाती निधन

NCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे

Udayanraje Bhosale | ‘युगपुरुषांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ – उदयनराजे भोसले

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा दुसरा विजय, हेमंत पाटील संघाची विजयी सलामी !

Must Read
Related News