‘या’ कारणामुळे काँग्रेसने मनसेची साथ नाकारली

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे पघडम वाजण्यास सुरुवात झाली आहे. भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी भाजप विरोधी ताकद एकवण्यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणजे शहरातील मराठी मतांना डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनसेला आघाडीत सामावून घेण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसने मात्र यास कडाडून विरोध केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2afc8fe9-c49b-11e8-9eaf-e7d1d5d53646′]

‘राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर मुंबईत काँग्रेसचे मोठे नुकसान होईल. उत्तर भारतीय मतदार नाराज होतील’, असे मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चेसाठी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी महाआघाडीत मनसेच्या समावेशाबाबत विचार केला जावा असा प्रस्ताव मांडला. मलिकांच्या या प्रस्तावाला काँग्रेसच्या संजय निरुपम आणि इतर नेत्यांनी कडाडून विरोध केला.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3805d05e-c49b-11e8-bf1e-138620443478′]

‘उत्तर भारतीय मतदारांमध्ये राज ठाकरे यांची प्रतिमा खलनायकापेक्षा कमी नाही. उत्तर भारतीय हे काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत हे मतदार भाजपसोबत गेले होते. यावेळी ते पुन्हा काँग्रेससोबत येण्याची शक्यता आहे. अशावेळी राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर उत्तर भारतीय मतदार पुन्हा नाराज होतील आणि याचा फायदा भाजपलाच होईल’, असं संजय निरुपम म्हणाले.

कुणाल कुमारांचे ‘गोंधळ’ निसरताना भाजपची दमछाक
शांतता भंग करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ : नरेंद्र मोदी

जाहिरात