महाराष्ट्र : नक्षलवादी शस्त्रे बनवणाऱ्या युनिटचा पर्दाफाश, 48 तासांपासून चकमक सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेजवळ गडचिरोली पोलिसांच्या सी -60 कमांडो युनिटच्या हाती मोठे यश लागले आहे. या सी -60 कमांडो युनिटच्या नेतृत्वात चालविल्या आलेल्या मोहिमेत शुक्रवारी नक्षलवादी शस्त्रे बनवणाऱ्या युनिटचा भांडाफोड करण्यात आला.

दरम्यान, अद्यापही कारवाई सुरु आहे. डीआयजी म्हणाले की, गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात गेल्या 48 तासांपासून कारवाई सुरू आहे आणि टीम छावणीत पोहचल्यानंतर तपशील उपलब्ध होईल.

गडचिरोली रेंजचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील म्हणाले की, छत्तीसगडच्या सीमेपासून पाच किलोमीटर अंतरावर माड भागात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक सैनिक जखमी झाला. यावेळी माओवाद्यांच्या शस्त्रास्त्र निर्मितीच्या युनिटचा भांडाफोड करण्यात आला आहे. तर पोलिस पथकाला मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे.