Maharashtra NCC | कौतुकास्पद! महाराष्ट्र एनसीसी ग्रुपने पटकावला मानाचा ‘प्रधानमंत्री बॅनर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra NCC | महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (Maharashtra NCC) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे (PM Banner) विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त केला आहे. तर मुंबईच्या (Mumbai) पृथ्वी पाटील (Prithvi Patil) हीने देशभरातून अव्वल येत मानाचा ‘गॉड ऑफ ऑनर’चा (God of Honor) मान पटकावत देशभरात सर्वोत्कृष्ट कॅडेट (The Best Cadets) ठरली. तर पुण्याचा (Pune) शंतनु मिसाळ (Shantanu Misal) हा देशभरातून चौथा आल्याची माहिती ब्रिगेडियर आर.के. गायकवाड (Brigadier R.K. Gaikwad) यांनी दिली.

प्रजासत्ताक दिन संचलन (Republic Day) शिबीराच्या निमित्ताने प्रतिष्ठेचा पंतप्रधान बॅनर पटकावण्याचा मान महाराष्ट्राला (Maharashtra NCC) मिळाला आहे. दिल्ली येथे शुक्रवारी झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात हा बहुमान प्रदान करण्यात आला. यावर्षी राज्यभरातून जवळपास 75 कॅडेट्सची निवड प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरासाठी करण्यात आली होती. अतिशय खडतर प्रशिक्षणानंतर राज्यातील 18 कॅडेट्सना राजपथावर (Rajpath) संचलन करण्याचा मान मिळाला. यात सिनीअर डिव्हीजनच्या (Senior Division) 10 मुले आणि 8 मुलींचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना लेफ्टनंट कर्नल अनिरुद्ध सिन्हा (Lieutenant Colonel Aniruddha Sinha) आणि मेजर आरुष शेटे (Major Arush Shetty) यांनी मार्गदर्शन केले.

 

File photo

सलग 6 वेळा विजेते पद

महाराष्ट्राच्या पथकाने 2002 ते 2004 दरम्यान सलग 6 वेळा विजेते पद मिळवले होते. यानंतर 2020,2021 मध्ये महाराष्ट्राकडे उपविजेतेपद आले होते आणि पुन्हा विजेतेपदाचा मान महाराष्ट्राच्या एनसीसी कॅडेट्सनी मिळवला आहे.

 

File photo


संपूर्ण राज्यातून 57 कॅडेट्सची निवड

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दिल्लीतील कँन्टॉनमेंट (Cantonment in Delhi) भागात आयोजित एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबीरात महाराष्ट्रातील 34 मुले आणि 23 मुली असे एकूण 57 कॅडेट्स सहभागी झाले. पुणे येथे 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2021 या कालावधी दरम्यान या कॅडेट्सचा कसून सराव झाला व कोरोना चाचण्याअंती हे कॅडेट्स 1 जानेवारी 2022 रोजी दिल्लीतील शिबिरात सहभागी झाले. प्रजासत्ताक दिनी राजपथावर झालेल्या पथ संचलनात सहभागी देशभरातील एनसीसीच्या 100 मुलींच्या तुकडीत महाराष्ट्राच्या 8 मुलींची निवड झाली. महाराष्ट्रातील 17 पैकी 9 मुलांची निवड राजपथवरील पथ संचलनासाठी झाली.

पुणे विभागाचे एनसीसी प्रमुख ब्रिगेडीअर आर.के गायकवाड यांनी सांगितले, प्रजासत्ताक दिनाच्या संचलन तुकड्यांसह एनसीसीची तुकडीही सहभागी होत असेत. या तुकडीतील छात्रांची निवड विशेष शिबिरातून होत असते. हे शिबीर अत्यंत खडतर असते. त्यामुळेच एकूण शिबीरार्थीपैकी जेमतेम पाच ते सात टक्के छात्रांची निवड प्रत्यक्ष संचलनासाठी होत. या विद्यार्थ्यांना पुण्यातील शिबिरात अत्यंत तज्ज्ञांकडून प्रशिक्षण दिले जाते. तसेच विद्यार्थ्यांनीही मनापासून आणि शिस्तीचे दर्शन घटवत हे यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : Maharashtra NCC | admirable performance maharashtras ncc group wins honorable pms banner

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’