‘अब_ आगे_ क्या होगा’ ! मंत्री जितेंद्र आव्हाडांचा PM नरेंद्र मोदींवर पुन्हा ‘निशाणा,’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी देशपातळीवर काम केले जात आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून कोरोनासंदर्भात राजकीय खल सुरु झाला आहे. कोरोनाविरोधात लढताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना 9 मिनिटांचा वेळ मागितला होता. 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता आपल्या घराबाहेर दिवा पेटवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तितक्याच क्षमतेने राजकारण करण्यात येत आहे.

नागरिकांनी घरातले लाईट्स ऑफ करुन दिवे लावून एकात्मतेचे दर्शन घडवले होते. आता मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथी चवदार तळ्याचा फोटो ट्वीट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. संकटाशी लढताना अंधार दूर लोटायचा असतो. ज्ञानसुर्य (डॉ.बाबासाहेब आंबेडकर) तेव्हाही तळपत होताच… आजही तळपतोच आहे. महाडची परंपरा कायम, जय _भीम अब_ आगे_ क्या, असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.

भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचे ठरवले म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.’ जे लाखो डॉक्टर्स, नर्स, वोर्डबॉय, पोलीस, सफाई कामगार, पाणी पुरवठा, वीज पुरवठा या सगळीकडे काम करणारे लोक आहेत. त्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये फक्त 101 रुपये द्या आणि त्याचा स्टेट्स आपल्या व्हॉट्सप, फेसबुकवर अभिमानाने ठेवा’, अशी विनंतीही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like