Maharashtra New Corona Guidelines | आजपासून राज्यातील निर्बंध शिथिल, काय सुरू, काय बंद?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra New Corona Guidelines | जगभरात धुमाकूळ घालणारा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनचा (Corona New Variant Omycron) राज्यात प्रदुर्भाव वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona Infected Patient) संख्येत मोठी घट झाल्याचे पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा (Restrictions Relaxed) निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. त्यानुसार आज पासून म्हणजे 1 फेब्रुवारी 2022 पासून सर्व पर्यटनस्थळं (Tourist Place), राष्ट्रीय उद्याने (National Park), सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लग्नसोहळे (Wedding) आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी (Cultural Program) आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सुचना जाहीर (Maharashtra New Corona Guidelines) केल्या आहेत.

 

राज्यात ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्यानंतर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला आहे. त्यानुसार मंगळवारपासून राज्यातील सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच लग्नसोहळे व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. (Maharashtra New Corona Guidelines)

 

अंत्यसंस्कारासाठी (Funeral) 20 व्यक्तींची मर्यादा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. अम्युझमेंट पार्क (Amusement Park), थिम पार्क (Theme Park), जलतरण तलाव (Swimming Pool), वॉटर पार्क (Water Park) 50 टक्के क्षमतेने, उपहारगृह (Restaurant), नाट्यगृह (Theater), चित्रपटगृह (Cinema) स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित (Local Authority) केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने, मनोरंजनात्मक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 लोकांना प्रवेश देण्यात आला आहे.

 

काय बंद, काय सुरु?

– सर्व पर्यटनस्थळं नियमित वेळेवर सुरु होतील. ऑनलाइन तिकिट खरेदी करावी लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचं लसीकरण (Vaccination) झालेले असावे.

 

– स्पा (Spa), ब्युटी पार्लर (Beauty Parlor) आणि सलूनमध्ये (Salon) 50 टक्के उपस्थिती राहील

 

– नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळेवर सुरू होतील. याठिकाणी भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेलं असणे बंधनकारक आहे. तसेच मास्क वापरणे आवश्यक आहे. दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी ऑनलाइन तिकिट बुक करावे लागेल.

 

– अंत्ययात्रामध्ये उपस्थितावर मर्यादा ठेवण्यात आलेल्या नाही. कितीही लोक उपस्थित राहू शकतात

 

– उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

 

– हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार आहे.

 

– अम्युझमेंट पार्क, थीम पार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील.

 

 

Web Title :-  Maharashtra New Corona Guidelines | maharashtra corona guidelines revised directions for containing spread of coronavirus

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Draft ward Structure | पुणे महानगरपालिका : प्रभाग रचनेचा नकाशा अधिकृतरित्या जाहीर, अनेकांच्या नगरसेवकपदाच्या ‘आकांक्षा’वर ‘पाणी’?; जाणून घ्या 58 प्रभागांतील मतदार संख्या

 

Hindustani Bhau Arrested | विद्यार्थी आंदोलन प्रकरणी हिंदुस्तानी भाऊला अटक

 

PMC Draft ward Structure | 34 गावांचा समावेश आणि त्रिसदस्यीय प्रभागामुळे अनेक विद्यमान ‘डेंजर झोन’ मध्ये