Maharashtra New Rules For Bullock Cart Race | बैलगाडा मालक आणि आयोजकांसाठी महत्त्वाची बातमी; ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra New Rules For Bullock Cart Race | बैलगाडा शर्यतींना न्यायालयाने (Court) परवानगी दिली असली तरी त्यासाठी काही अटी आणि शर्ती लावल्या आहेत. त्यानंतर राज्यभर बैलगाडा शर्यती (Bullock Cart Race) होत असलेल्या दिसत असून या शर्यतींनाही मोठ्या संख्येने लोक पाहायला जात आहेत. मात्र अशातच ठाकरे सरकारकडून (Thackeray Government) बैलगाडा शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नव्या नियमावलीनुसार आता शर्यतीचं आयोजन करता येणार आहे.

 

काय आहे नवीन नियम –

बैलगाडा शर्यतींच्या नव्या नियमावलीमध्ये बैलांचा छळ करणे, त्यांना उत्तेजक द्रव्य देणे. त्यासोबतच एक हजार (1000 Meter) मीटर अंतरांची अट ठेवण्यात आली आहे. त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे आता शर्यतीचं आयोजन करण्याअगोदर पंधरा दिवस आधी परवानगी घ्यावी लागणार आहे.

 

बैलाचं शारीरिक तंदरूस्तीचं प्रमाणपत्र, अनामत रक्कम आणि शर्यतीवेळी मद्याचा वापर न करणे, बैलावर चाबूक आणि कात्रीचा वापर न करणे, अशा स्वरूपाची नियमावली बैलगाडा शर्यतीसाठी शासनाने लागू केली आहे. या नियमावलीचा भंग झाल्यास शर्यत आयोजकांवर कारवाई होणार आहे.

 

दरम्यान, आता ग्रामीण भागात यात्रा असल्याने मोठ्या प्रमाणात शर्यतीचं आयोजन करण्यात येत आहे.
मात्र अनेक ठिकाणी नियमांचं पालन केलं जात नसल्याचं समोर आलं.
त्यासोबतच काही ठिकाणी अपघातही (Accident) झाले, त्यामुळे शासनाने नवी नियमावली लागू केली आहे.

 

Web Title :- Maharashtra New Rules For Bullock Cart Race | maharashtra thackeray government announces new rules for bullock cart race

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा