Amravati News | अमरावतीमध्ये मोठी दुर्घटना ! होडी उलटल्याने एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले; तिघांचे मृतदेह बाहेर काढले, मदतकार्य युध्दपातळीवर सुरू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Amravati News | अमरावती (Amravati News) जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे वर्धा नदीत होडी उलटल्याने 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. दुघटनेनंतर 3 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उर्वरित 8 जणांचा शोध घेण्यात आहे. अमरावतीच्या गाळेगाव परिसरात घडलेल्या या दुर्घटनेनंतर पोलीसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले होते. तसेच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दशक्रियेच्या विधीसाठी एकाच कुटुंबातील 11 जण गाडेगावामधील मटरे कुटुंबियांकडे आले होते. विधी संपल्यानंतर आज (मंगळवार) सकाळी नरखेड तालुक्यातील झुंज येथे ते सर्वजण गेले होते. वर्धा नदीच्या पाण्यातुन महादेवाचे दर्शन घेण्यासाठी ते होडीतून जात होते. त्यावेळी अचानकपणे होडी पलटी झाल्याने 11 जण नदी बुडाले आहेत. त्यामध्ये महिलांचा देखील समावेश आहे. आतापर्यंत तिघांचा मृतदेह सापडला असून इतरांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या मृतदेहांमध्ये नावाडयासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. होडीमध्ये बहिण, भावांसह जावई देखील होते. घटनास्थळी परिसरातील पोलिस अधिकारी आणि स्थानिकांनी धाव घेतली आहे. युध्दपातळीवर मदत कार्य सुरू आहे.

Web Titel :- Maharashtra News | 11 killed as boat capsizes in narkhed amravati

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | शिवसेनेच्या नगरसेवकाकडं मागितली तब्बल 15 लाखाची खंडणी ! माजी उपसरपंच, पत्रकार व 4 महिला कार्यकर्त्यासह 9 जणांवर FIR, ‘रिपोर्टर’सह दोघांना अटक

Gold Price Update | लागोपाठ चौथ्या दिवशी स्वस्त झाले सोने, आता 27532 रुपयात मिळतेय 10 ग्रॅम; जाणून घ्या नवीन दर

Beed Accident News | बीड-परळी मार्गावर 2 जीपची समोरासमोर धडक; दीर-भावजय जागीच ठार