महाराष्ट्रात 73 वा स्वातंत्र्यदिन ‘अशा’ पद्धतीने साजरी केला जाणार

पोलीसनामा ऑनलाइन: कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता येणारा स्वातंत्र्यदिन कसा साजरी केला जाईल हा सरकारसमोर एक प्रश्न होता. येणाऱ्या शनिवारी साजरा होणारा भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन असेल. राज्यात या स्वातंत्र्यदिनी मागील काही महिन्यांपासून कोरोना विरुद्ध लढत असलेल्या कोविड योद्ध्यांचा सन्मान केला जाईल. या वर्षी विविध ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सफाई कामगार, डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना निमंत्रित केले जाईल. तसेच कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलेल्या रुग्णांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.

राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेऊन एक प्रकारे त्यांच्या कामाची आणि जिद्दीची स्तुती केली आहे. स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण समारंभ सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीला मास्तर घालने बंधनकारक असणार आहे. राज्याचा मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम मुख्यमंत्र्याच्या उपस्थित मंत्रालयाच्या आवारात होणार आहे.

तसेच विभागीय स्तरावर आणि जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीही ध्वजारोहण कार्यक्रम केले जाणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. राज्यात सर्व ठिकाणी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला कोरोना रोखण्यात जे महत्वाची भूमिका बजावत आहेत त्यांना निमंत्रित केले आहे. यामध्ये ज्या सफाई कामगार, डॉक्टर, आरोग्य सेवक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी योगदान दिले त्यांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तसेच ज्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे त्यांनाही निमंत्रण दिले जाईल. यामुळे या सर्वांना हुरूप येऊन ते नव्या दमाने कोरोनाला हारवण्यासाठी सज्ज होतील अशी अपेक्षा आहे.