Maharashtra : बंद मॉलमध्ये आढळला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह, हत्येचा संशय, प्रचंड खळबळ

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईन – एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह बंद मॉलमध्ये आढळल्याने नागपुरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सीताबर्डी मेट्रो रेल्वे स्टेशनसमोरील फॉर्च्युन मॉलमध्ये शुक्रवारी (दि. 18) हा मृतदेह आढळला आहे. मुलाची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून शहरातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

एएसआय नरेंद्र बघेल असे पोलीस अधिकार्‍याचे नाव असून त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. गेल्या अनेक वर्षापासून फॉर्च्युन मॉल बंद आहे. या मॉलमध्ये शुक्रवारी बघेल यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. बघेल हे सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.