‘खदखद’ योग्य ठिकाणीच मांडली पाहिजे, फडणवीसांचा खडसेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्यात भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. पक्षात आपल्यावर अन्याय झाल्याचे एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले. त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. एकनाथ खडसेंनी अशा प्रकारे त्यांनी बोलायला नको होते. ते व्यासपीठ त्यासाठी नव्हतं, असे फडणवीस म्हणाले. आपले तिकीट का कापलं असा एकनाथ खडसे यांचा प्रश्न असेल तर त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला विचारावे. त्यांच्याकडून उत्तर मिळेल असे फडणवीस म्हणाले.

एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. मुलाखतमध्ये त्यांनी मुंडे आणि खडसे याच्या पक्ष सोडून जायच्या चर्चावर भाष्य केले. पक्ष एकसंघ राहील, हा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. भाजपमध्ये ओबीसींवर अन्याय होत नाही. हा ओबीसींचाच पक्ष आहे. खडसेंबद्दल किंवा ओबीसी समाजाबद्दल राग असता तर त्यांच्या मुलीला पक्षाने तिकीट दिलेच नसते, असेही फडणवीस म्हणाले.

मी त्यांच्या पाठिशी होतो
खडसेंवर आरोप झाले म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला हे खोटं आहे. पक्ष म्हणून मी त्यांच्या पाठिशी होतो. कुण्या एका संशयित आरोपीच्या सांगण्यावरुन तर खडसे याना नक्कीच काढलं गेलेलं नाही. त्यानंतर मी तातडीने त्यांच्या चौकशीचे आदेश एटीसएसला दिले आणि 12 तासाच त्यांच्यावरील आरोप खोटा असल्याचा रिपोर्ट आला. एटीएसने त्यांना क्लिन चिट दिली.

श्रेष्ठींकडे तक्रार करता येते
खडेसांना तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला. तिकीट का कापलं याचं कारण एकनाथ खडसेंना पाहिजे असेल तर त्यांना केंद्रीय नेतृत्व ते कारण देतील. पक्षात श्रेष्ठींकडे तक्रारी करता येतात. त्यांच्या मनात खदखद होती तर योग्य ठिकाणी व्यक्त करायला हवी होती, असेही फडणवीस म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/