Maharashtra OBC Political Reservation | ‘ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra OBC Political Reservation | गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (Maharashtra OBC Political Reservation) मुद्दा पेचात अडकला आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या आरक्षणाला मंजुरी दिली नसल्याने राज्यातील ओबीसी समाज नाराज आहे. अशातच आता राज्यात सत्तांतर झाल्याने नव्या सरकारवरही ओबीसींच्या आरक्षणाची जबाबदारी आहे. काल राज्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकींला अनेकांनी विरोध दर्शविला आहे. तसेच आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत असं मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे (Dhanjanya Munde) यांनी मांडलं आहे.

 

 

काय म्हणाले धनंजय मुंडे?

“ओबीसी आरक्षणा संदर्भात महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे. त्यामुळे राज्यातील 92 नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षण जाहीर झाल्याशिवाय होऊ नयेत, अशी आमची ठाम भूमिका आहे. नवीन सरकारने तातडीने याबाबत कार्यवाही केली पाहिजे,” अशी मागणी देखील धनंजय मुंडे यांनी केली आहे.

 

 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील अशी खंबीर पावले उचलावी. त्यामुळे सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास असल्याचं,” पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्यांनी याबाबत ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

Web Title :- Dhananjay munde and pankaja munde on Maharashtra OBC Political Reservation and elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा