Maharashtra Omicron variant | महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्याचा टास्क फोर्सचा अंदाज; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Omicron variant | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने अनेक देशात शिरकाव केला आहे. भारतातही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागील कोरोनाच्या दोन्ही लाटेनंतर आता ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव झाला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गामुळे कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. तर, महाराष्ट्रात (Maharashtra Omicron variant) फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता टास्क फोर्सने वर्तवली आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

 

देशातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे 200 हून जास्त रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे रुग्ण (Omicron variant) सर्वाधिक आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 77 रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले की, ‘टास्क फोर्सने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात फेब्रुवारीत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग वाढल्याने त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाबाबतचे नियम पाळणं गरजेचं आहे,’ असं आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. (Maharashtra Omicron variant)

पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉन व्हेरिएंटचीच (Omicron variant) असेल. पण त्याबाबत फार घाबरण्याची गरज नाही कारण ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये हॉस्पिटलाईज होण्याचे प्रमाण फार कमी आहे. परंतु, असं असलं तरी नाताळ आणि नववर्ष साजरं करताना काळजी घ्यावी.

 

Web Title :- Maharashtra Omicron variant | Covid task force estimates increase omicron patients maharashtra february health minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Health Department Exam Scam Case | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरण ! बीडच्या BJP पदाधिकाऱ्याला अटक, भाजपच्या गोटात खळबळ

Pune Crime | दारु पिण्यास अटकाव केल्याने डोक्यात फोडली बिअरची बाटली; चतुःश्रृंगी परिसरातील घटना

 

Bigg Boss 15 | देवोलिनाची आई अभिजीत बिचुकलेवर चांगलीच भडकली, म्हणाली…

Urfi Javed Skirt Viral Photo | रिव्हिलिंग स्कर्टमधील फोटोमुळं उर्फी जावेद झाली सोशल मीडियावर ट्रोल, नेटकरी म्हणाले – ‘तुझ्याकडे कपडे नाही का? नेहमीच अर्धवट कपडे घालते’

 

MahaTET Exam Scam | टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरण ! तब्बल 500 उमेदवारांचे निकाल बदलले, 5 कोटींचा व्यवहार; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यातील बिल्डरला 50 % व्याजदारे पैसे देणार्‍या बाबा बोडके टोळीतील निलेश जोशीला गुन्हे शाखेकडून अटक; 25 चे मागत होता 50 लाख, कोथरूडमधील 1200 स्क्वेअर फुटच्या फ्लॅटचा ताबा घेण्याची धमकी