राज्य सरकारच्या प्रयत्नांना झटका, फक्त २८ टक्के शेतकऱ्यांनाच सरकार देऊ शकले कृषीकर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र शासनाच्या राज्यातील सर्व १०० टक्के शेतकऱ्यांना ‘संस्थात्मक कर्ज पुरवठा’ करण्याच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची संख्या १.३६ कोटी असताना यातील केवळ २८.६४ टक्के लोकांना कर्जपुरवठा करण्यातच सरकार यशस्वी ठरले आहे. खरे तर महाराष्ट्रात वारंवार दुष्काळाची परिस्थिती ओढवत असताना इतक्या कमी प्रमाणात कर्जपुरवठा होणे महाराष्ट्रातील शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी धोकादायक आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये रब्बी आणि खरीप हे दोन्ही हंगाम मिळून केवळ ३८.९५ केवळ लाख शेतकऱ्यांनाच कर्जाचा लाभ मिळाला.

कर्जपुरवठा कमी का ?

राज्यामध्ये एकूण ७८ टक्के शेतकरी लघू आणि मध्यम दर्जाचे असून त्यांच्याकडील शेतीचे प्रमाण आणि उत्पन्न अगदीच कमी आहे. पीकनुकसानीचा फटका या शेतकऱ्यांना वारंवार बसत असतो. खरे पाहता शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याची मदत देण्यामध्ये कोणतीही वित्तीय समस्या नव्हती. कारण राज्यशासनाने अनेक वित्तीय संस्थांच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागांसाठी ५८,३२४ कोटी रुपयांची मदत दिलेली होती. असे असताना राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (SLBC) अहवालानुसार “आर्थिक वर्ष १०१८-१९ मध्ये दिल्या गेलेल्या ५८,३२४ कोटी रुपयांमधील केवळ ५४ टक्के म्हणजे ३१,२३७ कोटी रुपये कर्जाच्या स्वरूपात वाटले गेले.” राज्यातील दुष्काळामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या तुलनेत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पिकांचे उत्पन्न कमी होते. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (SLBC) म्हणण्यानुसार राज्यामध्ये असणाऱ्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जपुरवठा कमी प्रमाणात करण्यात आला.

कर्जमाफीनंतर पुनर्वित्तपुरवठा करण्यात वित्तीय संस्थांचे अपयश : मुख्यमंत्री

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” जिल्हा सहकारी बँकांसहित अन्य वित्तीय संस्था शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यामध्ये कमी पडल्या.” राज्य सरकारने हेदेखील स्पष्ट केले की नियमानुसार वित्तीय संस्था शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देण्यास नकार देऊ शकत नाहीत. मागील १९ महिन्यांमध्ये राज्य सरकारने ५१ लाख लोकांचे २३,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ केलेले आहे. त्यामुळे कमीत कमी या ५१ टक्के शेतकऱ्यांना तरी २०१८-१९ मध्ये पुनर्वित्तपुरवठा केले जाणे अपेक्षित होते. परंतु केवळ ३८.९५ लाख शेतकऱ्यांनाच कर्जपुरवठा केला गेला.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

जरा जपून, ‘या’ कारणांमुळे होऊ शकते केस गळती

‘या’ टिप्स वापरून मधुमेहावर करा नियंत्रण

धक्कादायक ! भारतीयांचं वयोमान वायू प्रदूषणामुळे तब्बल ‘एवढ्या’ वर्षांनी झाले कमी

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

 

 

Loading...
You might also like