राज्यातील विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणासाठी ‘EVM’चा ‘बहाणा’, उद्या होणार पत्रकार परिषद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून आता विरोधकही सत्ताधाऱ्यांना विविध प्रकारे खिंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकींपासून चर्चेत असलेला ईव्हीएम मशीनच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित करून राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधक आता एकत्र येणार आहेत.

विरोधी पक्षांना एकत्र येण्यासाठी EVM चा बहाणा ? 

मनसेकडून उद्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत प्रामुख्याने ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावर चर्चा होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे महाआघाडीतील सर्वच पक्षांचे बडे नेते यावेळी उपस्थिती दर्शवणार आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आले पाहिजे याची जाणीव सर्व विरोधकांना झाली असून त्यासाठी EVM हे केवळ एक निमित्त असल्याचर दिसून येत आहेत. EVM वर विश्वास नसल्याने येती विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी यासाठी हे पक्ष एकत्र येऊन मागणी करणार आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर EVM ला संपूर्ण देशभरातून वेगवेगळ्या माध्यमातून विरोध होत आहे. राज ठाकरे यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडे देखील मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. सत्ताधाऱ्यांची विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात ओढण्याची रणनीती पाहता सर्वच पक्ष हतबल झाल्याचे दिसत आहेत.

मनसेला नवसंजीवनी देण्यासाठी तसेच भाजप शिवसेनेचा विजयरथ रोखण्यासाठी राज ठाकरे या सर्व विरोधी पक्षांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ही एकी किती काळ टिकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –