मद्य, मांस विक्री आषाढी यात्रा काळात बंद ? वारकरी संप्रदायाची पुन्हा मागणी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आषाढी यात्रेच्या काळात पंढरपूर शहरात मांस आणि मद्य विक्रीच्या बंदीसाठी वारकरी सांप्रदाय पुन्हा आक्रमक झाला आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी यात्रेच्या तयारीसाठी आज झालेल्या आढावा बैठकीत वारकरी संप्रदायाच्या वतीने आषाढी यात्रेच्या काळात सात दिवस मांस आणि मद्याची विक्री बंद करण्याची मागणी लावून धरण्यात आली.

मागील अनेक वर्षांपासून दशमी ते द्वादशी अशी तीन दिवसांची मांस आणि मद्य विक्रीस बंदी शासन लागू करत असते. परंतु यावर्षी हि बंदी सात दिवसांपर्यंत वाढविण्यात यावी यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. वारकरी संप्रदायाच्या मागणीनुसार आषाढ शुद्ध दशमी पासून आषाढ शुद्ध पौर्णमेपर्यंत हि बंदी लागू करण्यात यावी.

याआधी वारकरी संप्रदायाने पंढरपूर शहरात मांस आणि मद्य विक्री कायमची बंद व्हावी, यासाठी अनेकवेळा आंदोलने देखील केली आहेत. या मागणीसाठी संप्रदाय मागील ३५ वर्षांपासून ठामपणे लढत आहे. वारकरी संप्रदायाच्या म्हणण्यानुसार जवळपास १२ ते १५ लाख हरिभक्त भाविक पंढरपुरात जमा होतात. परंतु मांस आणि मद्य विक्री पाहून यावेळी त्यांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे यावर बंदी टाकण्यात यावी. शासनाला महसूल मिळविण्यासाठी इतर अनेक ठिकाणे आहेत, त्यामुळे मांस, मद्य विक्रीतून मिळणाऱ्या महसुल कमी झाल्यास तितकासा फरक पडू नये असेदेखील संप्रदायाचे म्हणणे आहे.

यंदाची यात्रा असणार निर्मल वारी :

यंदा दोन्ही पालखी सोहळ्यात मिळून १७०० पेक्षा जास्त ई टॉयलेट बसविले जाणार असून स्वच्छतेची पूर्ण काळजी घेणार असल्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले. राज्यातील आणि जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जास्तीच्या टँकरची व्यवस्था केली जाणार असून कोठेही पाण्याची कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आषाढी यात्रेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी :

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ३० जूनपर्यंत शहरात सुरु असलेली कामे पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नियोजन पूर्ण झालेले असून सहा हजार कर्मचारी आणि अधिकारी यासाठी काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सिनेजगत

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?