साताऱ्यात उदयनराजेंविरोधात आघाडी ‘पावरफुल’ उमेदवाराच्या शोधात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उदयनराजे भोसले यांनी अमित शाह यांच्या उपस्थित दिल्लीमध्ये शनिवारी भाजपात प्रवेश केला. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी सोडल्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. पण, उदयनराजे भोसले यांचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची हा यक्षप्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसपुढे आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यास काँग्रेसला हा मतदारसंघ सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याची चर्चा देखील सुरु आहे.

सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी काल रात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज सकाळी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे.उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने आता या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकांच्या बरोबरच होणार असल्याचे बोलले जात आहे. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे. उदयनराजे राष्ट्रवादीमध्ये असताना, राष्ट्रवादीसाठी ही जागा एकतर्फी विजयाची होती.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या