Maharashtra Petrol-Diesel Price | दिलासा ! राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या आपल्या शहरांतील नवे दर
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Petrol-Diesel Price | महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झालं. त्यानंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यात लवकरच पेट्रोल-डिझेलचे दर (Maharashtra Petrol-Diesel Price) कमी करण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने काल (गुरूवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आज राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण झाली आहे. मध्यरात्रीपासून राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झालं आहे. (Maharashtra Petrol-Diesel Price)
कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारनं जनतेला हे गिफ्ट दिलं. या बैठकीत शेतकऱ्यांसाठीही अनेक निर्णय घेण्यात आले. विशेषतः पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदानातून वगळणार नसल्याचं सांगत सरकारने मोठा दिलासा दिला. सरकारने केलेल्या दरकपातीनंतर राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट झाली आहे.
शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
मुंबई – पेट्रोल – 106.25, डिझेल – 94.22
पुणे – 105 92
नागपूर – 106.03 92.58
नाशिक – 106.74 93.23
हिंगोली – 107.29 93.80
परभणी – 108.92 95.30
धुळे – 106.05 92.58
नांदेड – 108.24 94.71
रायगड – 105.96 92.47
अकोला – 106.05 92.55
वर्धा – 106.56 93.10
नंदुरबार – 106.99 93.45
वाशिम – 106. 37 93.37
चंद्रपूर – 106.14 92.70
सांगली – 105.96 92.54
जालना – 107.76 94.22
Web Title :- Maharashtra Petrol-Diesel Price | maharashtra petrol diesel price 15th july 2022 check latest rate full list mumbai pune nashik nagpur
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Rains Update | पुण्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
Ajit Pawar | ‘सध्या 2 जणांचे मंत्रिमंडळ, दोघेच महाराष्ट्राचे मालक झालेत’ – अजित पवार