Maharashtra Phone Tapping Case | फोन टॅपिंग प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्लांच्या अडचणीत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Phone Tapping Case | वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) फोन टॅपिंग प्रकरणामध्ये (Maharashtra Phone Tapping Case) मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) सीआरपीसी कलम 164 अंतर्गत सहा जणांचे साक्षीदार (Witness) म्हणून जबाब नोंदवण्यात आला आहे. या सहा जणांत त्यावेळच्या एसीएस होम (ACS Home) आणि डीवायएसपी (DySP) दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच, हे तेच डीवायएसपी आहेत जे त्यावेळी एसआयडीमध्ये State Intelligence Department (SID) तैनात होते आणि त्यांना टॅपिंगची माहिती होती. दरम्यान आता नोंदवलेल्या जबाबातून नेमकं काय उघड होतं ? हे महत्वाचं असणार आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, फोन टॅपिंगसाठी (Maharashtra Phone Tapping Case) बनावट नावाचा वापर करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्यासाठी ‘एस रहाटे’ आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP leader Eknath Khadse) यांच्यासाठी ‘खडसणे’ हे नाव वापरण्यात आले होते. या लोकांनी संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांच्याशी साधर्म्य असलेली नावे वापरली असल्याचे देखील म्हटलं जात आहे.

दरम्यान, वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी खोटे बोलून फोन टॅपिंग केल्याचा आरोप केला होता.
शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी हे फोन टॅपिंग केल्याचा आरोप झाला होता.
शुक्ला यांच्यावर संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे.
तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचा आरोप केला होता.
त्यानुसार शुक्ला विरोधात गुन्हा (FIR) दाखल केला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) तपासात नवनवे खुलासे बाहेर येताना दिसत आहे.

 

Web Title :- Maharashtra Phone Tapping Case | IPS rashmi shukla will be in deep trouble as 6 officers statement taken by mumbai police in phone tapping investigation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा