Maharashtra Phone Tapping Case | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचा फोन टॅपिंग प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Phone Tapping Case | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांच्या अडचणी वाढणार आहेत.
फोन टॅपिंग (Maharashtra Phone Tapping Case) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे.
यामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा फोन टॅप झाल्याचं समजत आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे.

 

2019 विधानसभा निवडणुकीनंतर (Maharashtra Assembly Election) सत्तासंघर्षावेळी हा सर्व प्रकार हंगामी मुख्यमंत्र्यांनी केल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत यांचा 60 दिवस तर एकनाथ खडसे यांचा 65 दिवस फोन टॅपिंग झाल्याची माहिती समजली.
कुलाबा पोलीस स्टेशन (Colaba Police Station) पोलिसांनी केलेल्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. (Maharashtra Phone Tapping Case)

 

रश्मी शुक्ला यांच्याकडून फोन टॅपिंग करण्यात आले होते त्यानंतर ही चौकशी पोलिस करत आहेत.
याआधी दोनवेळा रश्मी शुक्ला यांची चौकशी त्यानंतर संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली आणि आता खडसेंनी याप्रकरणात आपला जबाब नोंदवला आहे. आता रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

दरम्यान, याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे (Sanjay Kakde) यांचे फोन टॅप करण्यात आले होते.
याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी सांगितलं होतं.

 

Web Title :- Maharashtra Phone Tapping Case | ncp senior leader eknath khadse gave big information on phone tapping case sanjay raut IPS Rashmi Shukla

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा