Maharashtra Police | राज्यातील 4000 पोलिसांनी ईमेलद्वारे केली ठाकरे सरकारकडे ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | महाराष्ट्रातील पोलिस शिपाई आणि पोलिस अंमलदारांनी (Maharashtra Police) ठाकरे सरकारकडे (Thackeray Government) एक महत्वाची मागणी केली आहे. तब्बल 4 हजार पोलिसांनी ईमेल केला आहे. त्या संदेशात पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे. हा ईमेल (Email) त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना पाठवला आहे.

मागील 5 वर्षांपासून पोलीस खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाची परीक्षाही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या 5 वर्षात पोलीस शिपाई (Police constable) आणि अंमलदारांचं पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न अधांतरी राहिलं आहे. दरम्यान, 2016 सालच्या एमपीएससी परीक्षेतील अतिरिक्त 636 उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर समाविष्ट करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. (Maharashtra Police)

गतवर्षी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला होता. पोलीस अंमलदारांना निवृत्त होताना पोलीस अधिकारी बनता यावे, यासाठी निर्णय घेण्यात आला होता. पण, पोलिस दल नाराज झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण 636 उमेदवारांना जसं सामावून घेतलं आहे, त्याचप्रमाणे खात्यांतर्गत परीक्षा देणाऱ्या 2200 उमेदवारांनाही सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे पोलिसांनी थेट राज्य शासनाला ईमेलच्या माध्यमातून याबाबत मागणी केली आहे.

Web Title : Maharashtra Police | 4000 policemen in the state e mailed to the chief minister uddhav thackeray dcm ajit pawar and home minister dilip walse patil made this demand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी