Maharashtra Police | हातात रिव्हॉलवर घेऊन व्हिडीओ बनवणं पोलीस कर्मचाऱ्याला पडलं महागात; तडकाफडकी निलंबन (व्हिडीओ)

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Police | चांदूर बाजार पोलीस ठाण्यातील (Chandur Bazar) एका पोलीस कर्मचाऱ्याला हातात रिव्हॉलवर (Revolver) घेऊन व्हिडिओ बनवणं चांगलंच महागात पडलं आहे. महेश मुरलीधर काळे या पोलीस कर्मचाऱ्याने हा व्हिडीओ बनवला असून या घटनेनंतर त्याच्यावर अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरी बालाजी (SP Hari Balaji) यांनी निलंबनाची कारवाई (Maharashtra Police) केली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हातामध्ये रिव्हॉलवर घेऊन पोलीस गणवेशात महेश काळे (Police Constable Mahesh Kale) याने एक व्हिडीओ तयार केला होता. त्यामध्ये ते म्हणत होते, की ‘अमरावती जिल्ह्यात पाय ठेवताना दादागिरी आणि भाईगिरी 10 किमी लांबच ठेऊन यायचं. जो कायद्यात राहील तोच फायद्यात राहील. कारण कसं आहे, का कायद्याचा बालेकिल्ला म्हणजेच अमरावती जिल्हा. पोलीस कर्मचारी महेश काळे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, पोलीस कर्मचारी महेश काळे हे आपल्या शासकीय गणवेशाचा आणि रिव्हॉलवरचा गैरवापर करत असल्याचं व्हिडिओतुन समोर आलं आहे. तसेच, अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हरी बालाजी (SP Hari Balaji) यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. तसेच, पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी महेश काळे यांच्या निलंबनाचे आदेश देखील काढले आहेत.

Web Title : Maharashtra Police | amravati police personnel suspended after video with revolver went viral

eAadhaar | आधारसोबत नसताना कसे पूर्ण होईल बँकिंगपासून तिकिट घेण्यापर्यंतचे प्रत्येक महत्वाचे काम, UIDAI ने दिली मोठी अपडेट

Crime News | इमारतीवरून नवजात बालिकेला खाली दिले फेकून;
विरारमधील धक्कादायक घटना

‘कंगाल’ झालाय पाकिस्तान ! इस्लामाबादमध्ये पंतप्रधान निवासस्थान
भाड्याने देण्याची केली घोषणा

Gold Price Today | सोन्याच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर